खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

बौद्ध समाज बांधवांमार्फत संबोधी नगर येथे नियोजित जागेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-

संबोधी नगर येथील बौद्ध समाज नियोजित जागेत आज दिनांक सहा डिसेंबर 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम समाज बांधवांनी आयोजित केला असून सदरच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकर्त्या माननीय शमीभाताई पाटील या उपस्थित असून कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रवर्तन चौकातील महापुरुषांच्या प्रतिमांना फुलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर उपस्थित माननीय शमीभाताई पाटील मा बापू भाऊ ससाने माजी नगरसेवक मा बीडी गवई साहेब मा शाहीर धुरंदर साहेब मा वाहुळे सर मा नंदू भाऊ जाधव मा किरण भाऊ तायडे उपसरपंच उचंदे व मा शशी भाऊ तायडे तालुकाध्यक्ष संविधान आर्मी या मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार व फुले वाहून दीप व धूप पूजा करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या वेळी शमीभाताई पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनात त्यांनी केलेले कार्य याची माहिती देत असताना बाबासाहेब यांनी बहुजनांना काय दिलं याबाबत सांगत बाबासाहेबांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क व अधिकार दिले व माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार दिला त्यावर पुढे बाबासाहेब हे आमच्यातून निघून गेले नसून त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण माणसाला माणसाचं जगणं देण्यामध्ये घालून माणूस म्हणून त्याला जगता यावे यासाठी आटोक्याचे प्रयत्न करत आपली प्रकृती बरी नसताना सुद्धा आपल्यापर्यंत हक्क अधिकार पोहोचवून आजवर आपण माणूस म्हणून जगत असताना ते आपल्यामध्ये आहेत याची जाणीव करून दिली तसेच बाबासाहेबांचे कर्तुत्व सांगत सहा खंडामध्ये जवळ जवळ पाच हजार पानांपेक्षा जास्त लिखाण करून सदरचे लिखाण हे रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे भारताला दिलेले आर्थिक स्वातंत्र्य आमचे जीवन संघर्षमय असल्याबाबत सांगत कोणताही संघर्ष हा आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना व त्यांच्या स्मृतींना तसेच त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा व त्रिसरण व पंचशील यांचे आचरण करून माणूस म्हणून जगू शकतो इतके मोठे त्यांचे कार्य आहे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला आहे तो आमच्या बापाने दिला आहे त्यामुळे आमच्या हिताचा विचार करणारा व्यक्ती हा आमच्या मातीचा व मतीचा असला पाहिजे त्यामुळे जगत असताना बाबासाहेब हे आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे व त्यांच्या विचारांचे आपण पाईक झाले पाहिजे जय भीम हा नुसता शब्द नसून जय भीम हा आमचा स्वाभिमान आहे या शब्दात शमिभाताई यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून समाज बांधवांचे मनोबल वाढवून त्यांना ताकद व स्फूर्ती देण्याचे काम केले आहे
त्याचप्रमाणे सदर अभिवादन कार्यक्रमास बिडी गवई साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून त्यानंतर वाहुळे सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून बाबासाहेबांना अभिवादन करत सदरच्या कार्यक्रमात महत्त्वाचे मार्गदर्शन समाज बांधवांना केलेले आहे त्याचप्रमाणे संबोधी नगर मधील चिमुकली भूमिका नयन सुरवाडे हिने सुद्धा अभिवादन पर दोन शब्द व्यक्त केले सदर कार्यक्रमास मुक्ताईनगर येथील राजू बोदडे साहेब जगदेव इंगळे साहेब रवी भालेराव अन्नू बोदडे महाले आप्पा वानखेडे साहेब तसेच मुक्ताई नगर मधील सुज्ञ व जाणकार बौद्ध उपासक उपासिका यांनी उपस्थिती दिली सदर कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात बाबासाहेब यांच्या लेखणीतून वेटिंग फॉर विजा या पुस्तका ची वाटप करण्यात आली व समाजात बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचे कार्य करण्यात आले त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष विनोद सोनवणे साहेब यांनी चोखपणे कर्तव्य बजावणी केली सदरचा कार्यक्रम अतिशय शांततेत प्रबोधनात्मक पद्धतीने पार पडलेला असून त्याबाबत समस्त बौद्ध समाज बांधव यांचेमार्फत मान्यवरांचे व उपस्थितांचे तसेच शासन प्रशासनाने केलेल्या सहयोगाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमा चा समारोप एडवोकेट कुणाल गवई यांच्यामार्फत राज्यघटनेची उद्देशिका वाचून करण्यात आला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button