श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
*मुक्ताईनगर येथील मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर संचलित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी मा. आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन मा.ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांना रक्तदानाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व विशद केले व रक्तदान करून समाजाप्रती उत्तरदायी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती राजूभाऊ माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. एस. बी. साळवे व डॉ. वंदना चौधरी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. डी.एन.बावस्कर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. रंजना झिंजोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रासेयो स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.



