पालिकेच्या निर्माल्य कलश कृत्रिम तलावात आ. डॉ. संजय जी कुटे यांनी केले श्री गणपती बाप्पा यांचे विसर्जन..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरदास इंदोरे जळगाव जामोद
नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी आपल्या संकल्पनेतून श्री गणेश मूर्तीचे सुरक्षित विसर्जन करण्यासाठी शहरातील नागरिकांना गणरायाच्या विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी व जल प्रदूषणाला आळा बसावा या उदांत उद्देशाने नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या आवारामध्ये निर्मला कलश व कृत्रिम तलाव तयार करण्यात आला असून. आज 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन होत आहे नागरिकांनी श्री गणेश विसर्जन हे कृत्रिम तलावात करावे असे आव्हान मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी सर्व नागरिकांना केले होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांनी आपल्या घरी स्थापना केलेल्या श्री गणरायाचे विधीवत व पूजा आरती करून नगर परिषदेच्या कृत्रिम तलावात श्री गणरायाची विसर्जन केले.



