आईच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना परघरमोल परिवाराकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप!

४ शाळांमध्ये शैक्षणिक तथा लेखन साहित्यासह खाऊचे वाटप!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
आवाज न्यायाचा,
वृत्त संकलन विजय मनोहरराव घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा प्रतिनिधी
दि.१९ सप्टेंबर २०२६ |आई-वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परघरमोल कुटुंबाने विविध चार शाळांमध्ये शैक्षणिक तथा लेखन साहित्य व खाऊचे वाटप केले.
सविस्तर वृत्त असे की, भिमराव परघरमोल (लेखक व्याख्याचा तथा अभ्यासक फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला) यांच्या आई स्मृतीशेष द्रोपदाबाई परघरमोल यांचा दि. १९ सप्टेंबर रोजी स्मृतिदिन असतो. आईच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून तिच्या स्मृती जपण्यासाठी ते दरवर्षी विविध शाळांमध्ये शैक्षणिक लेखन साहित्यासह विविध वस्तूंचे वाटप करत असतात. त्याप्रमाणे यावर्षी त्यांनी संत गाडगेबाबा ज्ञानपीठ नगर परिषद शाळा क्र. २, तेल्हारा. मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर परिषद उर्दू शाळा तेल्हारा, जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा उकळी बु। व मराठी प्राथमिक शाळा सावळा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा या चार शाळांमध्ये शैक्षणिक तथा लेखन साहित्यासह खाऊचे वाटप केले.
यावेळी चारही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य व खाऊ मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. याप्रसंगी कुटुंबातील साहेबराव परघरमोल, शितल परघरमोल, वैभव परघरमोल, अरहंत परघरमोल, निकिता वाघ यांची उपस्थिती होती.



