यावर्षी संग्रामपूर तालुक्यात एकूण ७८ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना!!!एक गाव एक गणपती असा १५ गावात उपक्रम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
संग्रामपूर२०/९/२६ सविस्तर वृत्त असे की यावर्षी संग्रामपूर तालुक्यात एकूण 78 सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यामध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १५ गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना विशेष अशा प्रकारे राबविण्यात आली आहे. या अशा विशेष उपक्रमामुळे ग्रामस्थ एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत असून सामाजिक सलोखा व एकोपाचे वातावरण गावामध्ये निर्माण होण्यास मदत होत आहे. गेल्या सोमवार 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त संग्रामपूर शहरासह संपूर्ण तालुक्यात लाडक्या गणपती बाप्पाच्या मोठ्या प्रमाणात भक्तीमय वातावरणात आणि जल्लोषांमध्ये आगमन झाले. विविध सार्वजनिक ठिकाणी तसेच घरोघरी गणेश मंडळामध्ये गणरायाची विविध पूजा अर्चा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळाकडून यावर्षी धार्मिक कार्यक्रमासोबतच व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, सामाजिक एकोपा आणि स्वच्छता यासारख्या विषयांवर समाजामध्ये जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध गणेश मंडळांनी गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट केली होती. टाळ्यांचा गजर आणि ढोल ताशांचा निनाद आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये युवकांसह महिला व बालकांचे उत्स्फूर्त असा सहभाग दिसून येत आहे. संग्रामपूर तालुक्यामध्ये 15 गावात एक गाव एक गणपती तामगाव पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील बोडखा, लोहगाव, रिंगणवाडी, खळद, कुंदेगाव, झांसी, अकोली बुद्रुक, उकडी बुद्रुक, निमखेड, जास्त गाव, टाकळेश्वर, उमरा, कोद्री, काटेल, आणि धामगाव या अशा पंधरा गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत संग्रामपूर शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील ५० असे एकूण ५३ गणेश मंडळ आहेत तर सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनाळा शहरातील नऊ आणि ग्रामीण भागातील १६ अशी २५ मंडळे आहेत अशा प्रकारे संग्रामपूर तालुक्यात एकूण ७८ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झाली आहे.



