महाराष्ट्र

शेतात गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला :

मालेगाव पोलीस स्टेशन मध्ये तीन संशयत अटकेत

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : 7 सप्टेंबर
मालेगांव तालुक्यातील भिलदूर्ग येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेचा शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पांगरखेडा जाणाऱ्या रस्त्यावर भिलदूर्ग शिवारातील जंगलात टेकडीवर मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार नवऱ्या पासून घटस्फोट घेतल्यानंतर मालेगांव तालुक्यातील भिलदूर्ग येथे वडिलांच्या घरी राहून शेती करून उदरनिर्वाह करीत असलेली 45 वर्षीय महिला गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी शेतात काम करायला गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने काळजीत पडलेल्या परिवारातील लोकांनी तिचा शोध सुरू केला. गुरुवार ची रात्र उलटून गेली तरीही तिचा शोध लागला नाही. शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी दिवसभर शोधाशोध सुरू होती. अखेर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पांगरखेडा जाणाऱ्या रस्त्यावर भिलदूर्ग शिवारातील जंगलात टेकडीवर तिचा मृतदेह आढळून आला. पोलिस पाटलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार संजय चौधरी यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना घटनेची माहिती देऊन आपले सहकारी पोलिस उपनिरीक्षक माधव पेटकर, दिलीप रहाटे, रवि सैबेवार पोलिस हवालदार निलेश अहिर, सुनील पवार, शिवाजी काळे, किशोर चिंचोळकर पोलिस शिपाई ज्ञानेश्वर सानप, अमोल पवार, जितू पाटील, गणेश मेटांगळे, महिला होमगार्ड देवकाबाई भगत यांचेसह तातडीने घटनास्थळ गाठले. थोड्याच वेळात वाशिम येथून फॉरेन्सिक व डॉग स्वाड सुध्दा घटनास्थळी पोहचले पोलीसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालात सदर महिलेचा मृत्यू 24 तासा आधी झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेची फिर्याद शनिवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8.11 वाजता मृतक महिलेच्या भावाने दिल्यानंतर मालेगांव ठाण्यात अपराध क्रमांक 461 / 2024 नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या 64, 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार संजय चौधरी स्वतः करीत असून सदर प्रकरणात 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button