गणेशोत्सवात डीजेचा आवाज मर्यादित ठेवा,नियमांचे पालन करा !

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – दि. ७ सप्टेंबर: श्री गणेश स्थापना आणि विसर्जन मिरवणुका या उत्सव काळात उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन होऊ नये,यासाठी डीजेचा आवाज मर्यादेत ठेवण्याचे आवाहन मालेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय चौधरी यांनी गणेश मंडळांना केले आहे शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गणेश मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले यावर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश स्थापना होणार असून,शहर आणि ग्रामीण भागात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो मागील काही महिन्यांतील कावड यात्रा उत्सवात डीजेच्या आवाजामुळे अनेक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला होता,याची दखल घेत यंदा गणेशोत्सवात आवाज मर्यादांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा देण्यात आला आहे चौधरी यांनी स्पष्ट केले की,जल्लोष साजरा करताना डीजेचा वापर जरूर करा,मात्र आवाजाची मर्यादा ओलांडू नका कावड यात्रा उत्सवात याच नियमांचे पालन न झाल्याने अनेक तक्रारी आल्या होत्या,त्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारचे उल्लंघन सहन केले जाणार नाही प्रत्येक मंडळाने शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन योग्य प्रकारे उत्सव साजरा करावा पोलीस प्रशासनाने यासंदर्भात सतत गणेश मंडळांच्या बैठका घेतल्या आहेत,आणि त्यांना यावर्षीचे नियम आणि अटी समजावून सांगण्यात आल्या आहेत डीजेच्या आवाजाचे उल्लंघन झाल्यास मंडळावर तात्काळ कारवाई केली जाईल,अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे गणेश मंडळांनी जबाबदारीने वागून शांतता आणि सुव्यवस्था राखावी,यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे यामुळे सर्वांनाच एक सकारात्मक संदेश जाईल आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल, असे चौधरी यांनी नमूद केले.✍️



