बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतात काम करणाऱ्या युतीवर अस्वलाचा हल्ला युवती गंभीर जखमी…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता, प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगांव जामोद

शेतात कामासाठी गेलेल्या युवतीवर अचानक अस्वलाने हल्ला केला धक्कादायक घटना जळगांव जामोद तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर भिंगारा, पोस्ट सुनगाव परिसरात बुधवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास घटना घडली. या घटनेत गायत्री भाई लाल डावर ही युती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूर महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गायत्री डावर ही आपल्या वहिनी सोबत शेतात कामासाठी गेली होती. यावेळी शेत परिसरात अचानक अस्वल समोर आले. काही कळण्याच्या आतच अस्वलाने
गायत्री वर झडप घालत हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले पुढील उपचार अकोला येथे सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. अस्वलाचा वावर मानवी वस्तीजवळ आणि शेत परिसरात वारंवार होत असल्याचे पार्स्वभूमीवर वन विभागाने या भागात तातडीने गस्त वाढवावी. अस्वला च्या हालचालीचा मागोवा घ्यावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आणखी एखांदी गंभीर घटना घडल्यानंतर प्रशासन आणि वन विभाग जागे होणार का असा सवाल ही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे संबंधित यंत्रणेने या घटनेची गंभीर आणि दखल घेऊन भिंगार येथील शेतकरी व मजूर त्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button