मलकापूरमहाराष्ट्र

मोताळा तालुक्यामधील पशुवैद्यकीय तज्ञ यांच्या घरी दरोडा; दरोड्यामध्ये पशुवैद्यकीय तज्ञ यांच्या पत्नीचा खून ! पशुवैद्यकीय तज्ञ गंभीर जखमी !

मलकापूर प्रतिनिधी :- मोताळा तालुक्या मध्ये एका पशुवैद्यकीय तज्ञ यांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकुन दरोड्यामध्ये झालेल्या झटापटी मध्ये दरोडेखोरांनी पशुवैद्यकीय तज्ञाच्या पत्नीचा खून केला असल्याचा तर्क लावल्या जात आहे, तर पंशुवैद्यकीय तज्ञ हे गंभीर रित्या जखमी झाले असून, या गंभीर जखमी पशुवैद्यकीय तज्ञावर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत, मोताळा तालुक्या मधील दाभाडी येथे १९ जानेवारी२०२४ च्या पहाटे ही घटना उघडकीस आली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की मोताळा तालुक्या मधील दाभाडी येथील पशु‌वैद्यकीय तज्ञ गजानन टेकाळे यांच्या घरी मध्यरात्री च्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली, असून घरातील मालमतेची लूट करीत असताना दरोडे झालेल्या झटापटी मध्ये पशुवैद्यकीय तज्ञ यांच्या सुविद्य पत्नी माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला घरा मध्ये टेकाळे दांपत्य पती-पत्नी हेच घरी होते. त्यांची मुलगी सहलीला गेलेली असल्यामुळे ती बचावली याच दरम्यान सकाळी पाच वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या गजानन टेकाळे यांच्या भावाची
पत्नी दूध आणण्यासाठी तेथे गेल्या असता त्यांना हे दाम्पत्य दोघे पती-पत्नी घरात बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेले दिसले त्या नंतर
सदर घटनेची माहिती ही गावभर पसरताच गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली, या घटनेत पशुवैद्यकीय तज्ञ गजानन टेकाळे हे गंभीर जखमी अवस्थेत
मिळून आल्याने त्यांना ताबडतोब मलकापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले
परंतु त्यांची अवस्था ही चिंताजनक असल्यामुळे त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले
आहे सदर घटनेच्या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाचे पथक
घटनेची माहिती मिळताच क्षणी स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी, स्वान पथक, फोरेन्सिक लॅब पथक , तसेच बोराखेडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक , मलकापूर शहर पोलीस स्टेशन तसेच मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन, आणि एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ताबडतोब घटनास्थळी पोहोचले
तीन दिवसांपूर्वीच त्यांची मुलगी कु. वेदिका चा वाढदिवस साजरा करण्यात आला होता
गजानन टेकाळे या पशुवैद्यकीय तज्ञ यांच्या घरावर झालेल्या दरोडामुळे व त्यामध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण दाभाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तसेच ग्रामस्थांकडून दरोडेखोरांना अटक करण्याची मागणी होत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button