खानदेशजळगावा जिल्हाबोदवडमहाराष्ट्र

बोदवड तालुका क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू; आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रश्नाला शासनाचे उत्तर

बोदवडला आधुनिक क्रीडा संकुलाची आशा; जागा निश्चितीसाठी शासनाची हालचाल सुरू

बोदवड | प्रतिनिधी

बोदवड तालुक्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई पवार यांनी लेखी उत्तराद्वारे दिली.

बोदवड शहरात शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागातील शासकीय जागेवर तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा विचार आहे का, असा प्रश्न आमदार खडसे यांनी उपस्थित केला होता. या संकुलामुळे बोदवड तालुक्यासह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी व खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या क्रीडा विकासाला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यासोबतच क्रीडा संकुलासाठी योग्य जागा निश्चित करून उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, अशीही विचारणा आमदार खडसे यांनी केली होती.

या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई पवार यांनी सांगितले की, बोदवड तालुका क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप अंतिम जागा निश्चित झालेली नाही. तसेच आधुनिक सुविधांनी सुसज्ज क्रीडा संकुल उभारल्यास परिसरातील तसेच आदिवासी विद्यार्थी व खेळाडूंना निश्चितच त्याचा मोठा लाभ होईल, ही बाब शासनाने मान्य केली आहे.

शासनाकडून जागा निश्चितीची प्रक्रिया सुरू असल्याने बोदवड तालुक्यातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये क्रीडा संकुलाच्या उभारणीबाबत सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button