जळगावा जिल्हाबोदवडभुसावळमहाराष्ट्रमुक्ताईनगरयावलरावेरशेती
रावेर लोकसभा अंतर्गत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
दि.०२ एप्रिल २०२४ रोजी जळगांव जिल्ह्यासह रावेर लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीट मुळे झालेल्या नुकसानीची अंतुर्ली (मुक्ताईनगर) येथे भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच झालेल्या पंचनामे बाबत माहिती घेतली.
अवकाळी पाऊस, जोरदार वादळ व गारपीट मुळे जिल्ह्यात उभ्या पिकांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी यांना आश्वासन देऊन धिर दिला.
यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



