बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यास तांत्रिक अडचण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगांव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत नाव समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. शेतीची मशागत सोडून मात्र,या प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी वापरले जाणारे संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने प्रक्रिया खंडित होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून तासंतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकदा रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. काही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्याही प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत असून, विशेषतः दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button