युवकांचे ग्रामपंचायत कार्यलया समोर येथे ठिय्या आंदोलन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:गजानन तांगडे खामगांव
खामगांव तालुक्यातील पिंपळगाव राजा ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता,विकास कामे,निधीचा वापर आणि पारदर्शकतेच्या अभावाबाबत चौकशी करण्याच्या मागणीसाठी युवा नेते शोएब आसिम यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी सोमवार, 10 ऑगस्ट पासून पिंपळगाव राजा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्यांबाबत लेखी आश्वासन द्यावे,यापूर्वी 3 जुलै रोजी जन आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत संबंधित विविध प्रश्न प्रशासना समोर मांडण्यात आले होते. 1ऑगस्ट रोजी उत्तर प्राप्त झाले मात्र ते उत्तर समाधानकारक नसल्याने पुन्हा तक्रार व पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रारी व निवेदने सादर करण्यात आली. निवेदनाद्वारे मांडलेल्या सर्व मागण्यांवर तातडीने कारवाई करून त्या पूर्ण करण्याबाबत स्पष्ट व लेखी आश्वासन देण्यात यावे,तसेच ग्रामपंचायतच्या परिसरातील आवारात तातडीने CCTV कॅमेरे बसवण्यात आले पाहिजे. जेणेकरून कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता राहील. या माध्यमातून प्राप्त होणारी अधिकृत कागदपत्रे व माहिती तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे आंदोलन करताना स्पष्ट केले. यानंतर मागण्यांवर ठोस कारवाई व लेखी आश्वासन न मिळाल्यास 12 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असुन अशी घोषणा करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते शोएब असीम, मो. हसन इनामदार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले आहे.



