
शहर पोलीस स्टेशन मध्ये जमावाचा राडा,एका युवकाने ठाण्यात डोकं फोडून घेतलं,अवैध दारू विक्री बंद करा महिलांचा एल्गार,बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी शेगांव शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी शहर पोलीस स्टेशनला महिलांनी एकच गोंधळ घातला. यामध्ये कारवाई होत नाही म्हणून जमावातील एकाने चक्क पोलिसांसमोरच आपलं डोकं फोडून घेतलं. यामुळे पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ उडाली. शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर भागामध्ये मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्री करीत आहे याचा त्रास या परिसरातील नागरिकांना होत आहे वेळोवेळी पोलीस स्टेशनला कळविल्यानंतरही कारवाई होत नसल्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास या भागातील महिलांसह नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठून दारू विक्री त्या विरोधात कारवाईची मागणी केली. दरम्यान सदर दारू विक्री करणाऱ्या इसमाला पोलिस स्टेशन ला आणले उपस्थित असलेल्या नागरिकांना ॲट्रॉसिटी मध्ये अडकविण्याचे धमक्या दिल्या. यामुळे जमाव संतप्त झाला दरम्यान पोलीस कारवाईला उशीर करीत आहे असा आरोप करीत जमावातील एका युवकांनी स्वतःचा डोकं जमिनीवर आपटून जखमी करून घेतले. या घटनेमुळे पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान दारू विक्री करणाऱ्या खंडारे नामक इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



