शेतकर्यांच्या हितासाठी शेतकरी विकास पॅनल कटीबध्द

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)!
श्री विजयबाप्पु देशमुखआसरा माता संस्थान गायगाव बु. प्रचाराचे नारळ फुटलेशेगांव (ता.प्र) ३० एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या शेगांव बाजार समितीच्या निवडणूकीत शेतकर्यांच्या हितासाठी शेतकरी विकास पॅनल कटीबध्द आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते श्री विजयबाप्पू देशमुख यांनी केले.शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारास दि.२१ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वा गायगांव बु येथील आसरा माता च्या चरणी नतमस्तक होऊन प्रचाराचे नारळ फोडून प्रारंभ करण्यात. आला.यावेळी श्री विजयबाप्पू देशमुख बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि श्री विजयबाप्पू देशमुख होते.तर पॅनल प्रमुख, गोविंदराव मिरगे, संतोषबापू देशमुख,अँड.प्रवीण कडाळे, रविसेठ मुरारका, गोपाल चौधरी, वंचित चे मा. प्रदीपभाऊ वानखडे,जिल्हा प्रभारी, मा.शरदभाऊ वसतकार पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष ,मा. गणेश भाऊ चौकसे,जिल्हाअध्यक्ष, तालुकाध्यक्ष, दादाराव अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना ते म्हणाले की बाजार समिती निवडणूक ही घराणेशाही विरूध्द लोकशाही अशी आहे.शेतकरी विकास पैनल सत्तेत आल्यास सर्व सामान्य शेतकर्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल व त्यांच्या अडी अडचणी प्राधान्यांनी सोडविण्यात येतील अशी ग्वाही पॅनलच्या वतीने श्री विजयबाप्पू देशमुख यांनी दिली.यावेळी विजय भालतीडक, निळकंठ लांजूळकर, वैभव देशमुख, गजानन डिगोळे, पांडुरंग शेजोळे (अण्णा),अजय देशमुख, शशिकांत भाऊ भेंडे, आत्माराम महाले, पांडुरंग सावरकर यांच्यासह सर्व उमेदवार तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी ,सर्कल कार्यकारणी, सर्व ग्राम शाखेचे अध्यक्ष तथा सर्व आजी-माजी पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नारिकांची उपस्थिती होती.
देवानंद उमाळे ,शेगाव




