बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड, हनुमान सागर येथे धरणे आंदोलनास सुरुवात

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता.प्रतिनिधी.

वारी भैरवगड/ तेल्हारा.शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वान धरणावर लोकजागर मंचच्या वतीने अनिल गावंडे यांच्या नेत्रृत्वात या धरणे आंदोलनाला गुरुवार दि.20/04/23 पासुन सुरुवात केली. अनिल गावंडे हे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत असतांना ते म्हणाले,आमचा कुणाच्याही पिण्याच्या पाण्याला विरोध नाही परंतु बाळापूर मध्ये जवळच कवठा बॅरेज सारखे अनेक प्रकल्प जवळ असताना दूरवरून वान धरनातुन पाणी नेण्याचा घाट घालने व राजकीय स्वार्थापोटी आंदोलने करणे चुकीचे आहे वान धरणातील पाणी अशाच प्रकारे जर आरक्षित झाले तर या भागातील शेतकरी बांधवांना सिंचनाकरिता पाणी मिळणार नाही आणि या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय होईल त्यामुळे वानचं पाणी या भागातील शेतकऱ्यांचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही अनेक प्रकाराच्या माध्यमातून ,शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी पाणी परिषद आयोजित करून खऱ्या अर्थाने सिंचन कायदे काय आहेत हे शेतकरी बांधवांच्या लक्षात आणून दिले आणि शेतकरी बांधवांच्या हितार्थ आम्ही लढा देत आहोत सदर दोन्ही योजना शासनाने रद्द कराव्यात तसेच शेतीसाठी पाणी आरक्षित करण्यात यावे व पाणी वापर संस्थांचे पुनर्जीवन करण्यात यावे तसेच पाणी वापर संस्था वरील बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे कॅनॉल गेट व पाट सऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी विदर्भ वाटर ग्रीड स्थापना करण्यात यावी बंद पडलेले जलविद्युत केंद्र चालू करण्यात यावे इत्यादी मागण्यासाठी लोकजागर मंचच्या वतीने अनिल गावंडे यांच्या नेतृत्वात तेल्हारा तालुक्यातील वान धरणावर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून या आंदोलनामध्ये परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button