जुन्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव, : क्षुल्लक
कारणावरून दोन कुटूंबात ता.१४ एप्रिल रोजी रात्री वाद होवून वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून शहर पोलिसांनी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात सहदेव गजानन सूरवाडे, रा. संविधान चौक शेगाव याने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, त्यांचे चूलत काका महेंद्र सुरवाडे व त्यांच्यात अनिल सुरवाडेच्या घराचा दरवाजा पाडण्याचे कारणाहुन जुना किरकोळ वाद होता. मात्र सोमवारी रात्री घरी असताना अमोल सपकाळ याने तुळशीची कुंडी उचलून माझे डोक्यात मारली, त्यामुळे डोके फुटून रक्त निघाले व महेंद्र सुरवाडे यांनी त्यांच्या हातातील काठीने माझ्या डोक्यावर मारहान केली. तसेच महेंद्र सुरवाडे व अनिल सुरवाडे यांनी माझ्या
वडिलांना काठीने डोक्यावर मारहाण केली आणि गौरव सुरवाडे यांनी माझी बहिण व पत्नीला सुध्दा मारहाण करून आम्हा सर्वांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपी महेंद्र सुरवाडे, सुनिल सुरवाडे, गौरव सुरवाडे, अमोल सपकाळ सर्व रा. संविधान चौक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर जितेंद्र नारायण सुरवाडे, रा. संविधान चौक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी घरासमोर येवून शिवीगाळ करत घरातील सदस्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मंगेश मोरे, रा. लोहारा, सहदेव सुरवाडे, गजानन सुरवाडे दोन्ही रा संविधान चौक व मयुर हिवराळे रा.इंदीरा नगर यांचे विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.



