बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ खामगाव तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडी खामगाव च्या वतीने आज निवेदन देण्यात आले

*स्क्रिप्ट :- *भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ खामगाव तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडी खामगाव च्या वतीने आज निवेदन देण्यात आले*

खामगाव प्रतिनिधी डॉ. ज्ञानेश्वर ह. रावणकार

स्टार लाईव्ह एक्सप्रेस न्युज चैनल

*खामगाव प्रतिनिधी:- वंचित बहुजन युवक तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९/१२/२०२२ रोजी पैठण येथे आयोजित कार्यक्रमात ” कर्मवीर भाऊराव पाटील, म.जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांकडे भिक मागुन शाळा चालू केल्या असे वादग्रस्त विधान करून या महापुरुषांचा अवमान केला आहे. वारंवार भाजपाकडून होणाऱ्या महापुरुषांच्या अपमानामुळे राज्यात बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन संपुर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही आपणास या निवेदनाद्वारे विनंती करतो आहे कि राज्यात सुव्यवस्था बिघडवणारे भाजपा नेते मनोरुग्ण आहे त्यामुळे त्यांचीमंत्री पदावरून हकालपट्टी करून नागपूर येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात यावे.तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदविणारे पुणे येथील पिंपरी चिंचवडच्या आंबेडकरी चळवळीतील तरुणांना राजकीय सत्तेचा दुरूपयोग करून 307 आणि 353 गंभीर गुन्हा मनोज भास्कर घरबडे, धनंजय भाऊसाहेब इजगज, विजय धर्मा ओव्हळ या युवकांन वरिल दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे. सदर पिंपरी चिंचवड मधील घडलेली घटना या पुर्णपणे भाजपा नेते जबाबदार आहेत असे असतांना सुध्दा सदर घटनेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत ११ कर्मचारी निलंबित केले त्यांचे निलंबन त्वरीत मागे घेण्यात यावे. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जो निषेध नोंदवला त्या निषेधाचा व्हिडीओ आणि बातमी बनवून पत्रकार गोविंद वाकडे आंदोलकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या पत्रकारावर सुध्दा राजकीय द्वोषातुन दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याबाबत सर्व महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांची त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा वंचित बहुजन युवक आघाडी खामगाव तालुका वतीने या विरोधात लोकशाही मार्गाने आक्रमक स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल याची आपण नोंद घ्यावी अशा प्रकारचे वंचित बहुजन युवा आघाडी खामगाव तालुक्याच्या वतीने मनोरुग्ण भाजपा भिक फंड आंदोलन करून तहसील खामगाव येथे निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे,तालुका अध्यक्ष प्रभाकर वरखेडे,शहर अध्यक्ष धम्मपाल नितनवरे,मा.ता.अध्यक्ष संघपाल जाधव,कृ.ऊ. बा.स.संचालक राजेश हेलोडे,महिला जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग,युवा तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार, युवा ता.महासचिव चंद्रकांत टेरे,भा.बौ.महासभा शहर अध्यक्ष दादाराव हेलोडे,एकनाथ हिवराळे,विष्णू गवई,पवन तेलंग,नितीन सूर्यवंशी, गिरीश उमाळे,वैभव हिवराळे,प्रशांत वाकोडे,ईश्वर इंगोले,मिलिंद शिरसाट,कस्तुरबाई भटकर,लताबाई हिवराळे,शीलाबाई सरकटे, जिजाबाई वानखेडे, सुनंदा गव्हांदे,सत्यभामा इंगळे व इ.शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button