क्राईममहाराष्ट्र

शेजारील घरात घर फोडी करणारे अट्टल पती-पत्नीला राहुरी पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद करून हस्तगत केलेला सोने व चांदीचा मुद्देमाल दिला फिर्यादीच्या ताब्यात

  • प्रेस नोट -08 04 2025
  • दिनांक 03/12/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु र नं-1251/2024 बीएनएस कलम- 305(अ),331(3,6)प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता.नमूद सदर दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने,
    सदर गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इम्रान निसार शेख वय 30 व त्याची पत्नी.आयशा कासम शेख वय 31 रा.यावल, तालुका-यावल,जिल्हा जळगाव.. हल्ली रा- मुलंनमाथा ता.राहुरी यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपासात कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने,त्यांना अटक करून मा. हुजूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन रिमांड कालावधीमध्ये चोरीस गेलेला 64000/-रुपये किमतीचा मुद्देमाल राहुरी व यावल जिल्हा जळगाव या ठिकाणांवरून राहुरी पोलिसांनी हस्तगत केला होता.
    सदरचा मुद्देमाल मा. न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी वाशिम शेख व त्याची पत्नी हसीना वसीम शेख यांचे ताब्यात मा.पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांच्या हस्ते आज दि.08/04/2025 रोजी देण्यात आला आहे.
  • ( संजय आर.ठेंगे )
  • पोलीस निरीक्षक
    राहुरी पोलीस स्टेशन
    जि.अहमदनगर.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button