शेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील माजी विद्यार्थी यांचा मेळावा कार्यक्रम संपन्न…

….. जीडी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी.. संत नगरी शेगाव येथील राख्यात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह असून सन 1980 ते 2000 च्या दरम्यान असलेले माजी विद्यार्थी यांचा सस्नेह मेळावा भव्यदिव्य कार्यक्रमात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बागे सर तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथील प्रांगणात माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले .त्यामध्ये वस्तीगृहातील जीवन कसे असते, आणि वस्तीगृहातील विद्यार्थी कसा घडतो ,या विषयावर सर्वांनी मनोगत व्यक्त केले. व सविस्तर चर्चा झाली. या माध्यमातून वस्तीगृहात असलेले विद्यार्थी यांना या कार्यक्रमामुळे प्रेरणा मिळाली. यातील काही विद्यार्थी शेगाव निवासी असल्याने त्यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन करून आभार प्रदर्शन केले …



