पत्रकारबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव येथील तहसीलच्या एका लिपीकास लाज घेताना अटक केली

शेगाव येथील तहसीलच्या एका लिपीकास लाज घेताना अटक केली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव येथील तहसीलच्या एका लिपीकास लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल घोगरे व त्यांच्या पथकाच्या साहाय्याने सापळा रचून सदर लिपिकास लाच घेताना पकडले आहे. तहसीलच्या महसूल सहाय्यक प्रस्तुतकार संदीप अर्जुनराव दाभाडे वय ४६ ह्याला अडीच हजार रुपयाची लाच घेतांना अटक केली आहे.तक्रारदार यांची वडीलोपार्जीत ग्राम येऊलखेड तालुका शेगाव येथे शेती असून, सदर शेतीला वारसाहक्काने लागलेले नावा प्रमाणे शेती, तक्रारदार यांचे वडील व काका यांचे नावाने करणे असल्याने त्याकरिता होती.. तुकडेबंदी आदेशानुसार सदर शेती नावावर करण्याकरीता अडचण येत होती. तक्रारदार यांनी सदरची ती शेती नावावर होण्याकरिता उपविभागीय अधिकारी, खामगाव यांचेकडे परवानगी मिळणेबाबत अर्ज केलेला होता. त्या अर्जावरून उपविभागीयकार्यालय खामगाव यांनी तहसिल कार्यालय, शेगाव यांना अहवाल मागीतला होता. सदरचा अहवाल तहसिल कार्यालय, शेगाव येथून उपविभागीय अधिकारी कार्यालय, खामगाव येथे पाठविण्याकरिता लोकसेवक महसूल सहाय्यक संदीप दाभाडे यांनी ३ हजार लाचेची मागणी करित असल्याबाबत लेखी तक्रार लाच लुचपत प्रतीबंधक विभाग, बुलडाणा यांचेकडे केली वाणी,त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता, आरोपीने तडजोडी अंती २ हजार ५०० रुपये लाच मागणी करून तहसिल कार्यालय शेगाव येथे लाच रक्कम स्विकारली. त्यावरून दाभाडे यांनारंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. सदर कार्यवाही मारोती जगताप, पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो, अमरावती, देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे अँटी करप्शन ब्युरो बुलडाणा, सापळा पथक महेश भोसले पोलीस निरीक्षक, सफौ.शाम भांगे, पोहेकॉ विलास साखरे, नापोकॉ. विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकॉ शैलेश सोनवणे, मपोकॉ. स्वाती चालक नागोका नितीन शेटे यांनी पार पाडली. कुठल्याही शासकीय कार्यालयामधे लाचेची मागणी केल्यास, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपाधीक्षक शितल घोगरे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button