महाराष्ट्रविदर्भसामाजिक

केळवद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण…

हा देश बाबासाहेबांमुळे एकसंघ, बाबासाहेबांचे देशावर अंनत उपकार… श्री विद्याधर महाले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

चिखली : प्रतिनिधी

आरुना दत्तात्रय खंडागळे

चिखली विधानसभा मतदारसंघातील केळवद येथे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडले. या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रi राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव श्री. विद्याधर महाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना श्री. विद्याधर महाले यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून आधुनिक भारताच्या सामाजिक व वैचारिक क्रांतीचे महानायक आहेत. त्यांच्या विचारसरणीमुळे भारताला समानता, न्याय आणि बंधुता यांची भक्कम पायाभरणी मिळाली.हा देश बाबासाहेबांमुळे एकसंघ राहिला असून बाबासाहेबांचे देशावर अंनत उपकार आहेत.त्यांच्या महान कार्यामुळेच त्यामुळेच भारत आज अखंड व सार्वभौम राष्ट्र म्हणून जगासमोर ठामपणे उभा आहे.”

माता रमाई आंबेडकर यांच्या त्याग व समर्पणाचा उल्लेख करत त्यांनी पुढे सांगितले की, “माता रमाई यांच्या अथक त्यागाशिवाय भीमरावांचे ‘बाबासाहेब’ होणे शक्य झाले नसते. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळेच बाबासाहेबांना शिक्षण व सामाजिक कार्यासाठी आवश्यक आधार मिळाला. त्यामुळे माता रमाई यांचे योगदान हे भारतीय समाजाच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.”

माता रमाई जयंतीच्या औचित्याने उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याला “द सिम्बॉल ऑफ नॉलेज” असे नामकरण करण्यात आले असून, हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button