शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या आर्थिक आर्शिवादाने अवैध रेतीची तस्करी जोरात सुरुनदी पात्रालगतची शेत झाली अवैध रेतीचे आगार (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

शेगाव तालुक्यात व परीसरात अवैध रेतीची तस्करी करणार्यानां तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आर्थिक आर्शिवाद प्राप्त झाल्याचे दिसुन येत असुन दिवस रात्र रेतीचे टीप्पर वाहतुक करतांना दिसुन येत आहे.
याबाबत सविस्तर असे की, शेगाव तालुक्यातील पुर्णा नदीच्या पात्रातुन रात्रदिवस वाळू उपसा सुरु आहे.यामधे पूर्णा नदीकाठावर असलेल्या भोनगाव,सगोडा,पेसोडा, मनसगाव, बोंडगाव. या गावातून अवैध रेतीचा उपसा जोरात सुरु असून पूर्णा नदी पात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांनी भले मोठे गड्डे खोदलेले आहेत. व नदीपात्रातगतच रेतीचे मोठे मोठे ढीग गाळून ठेवलेले आहेत. या गंभीर विषयाकडे शेगाव महसूल विभागाचे पर्यायाने तहसिलदार समाधान सोनवणे यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असुन अवैध रेती तस्करी करणार्यांचे चांगलेच फावले आहे. अवैध रेती वाहतूकदारांना शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांचा अभय व आश्रय असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन येत आहे. त्यामुळे हे अवैध रेती वाहतुकीचे वाहने भर दिवसा व उजळमाथ्याने शेगाव संत नगरीतून वाहतूक करताना दिसतात.
या राजरोसपने होत असलेल्या रेती तस्करीला पायाबंद घालण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी साहेब यांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित करून शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांची कान व डोळे उघडणी करून संत नगरीतील अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करावी. व शासनाचा महसुल वाचवावा अशी मागणी सुज्ञ नागरीकांकडून व्यक्त होत आहे.



