महाराष्ट्रविदर्भ

पतंजलि योग परिवार बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने रक्षाबंधन तथा शिक्षक दिन साजरा

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

आज दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोज मंगळवारला पतंजलि परिवार बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने शिक्षक दिन व रक्षाबंधन कार्यक्रम किशोरजी कुलकर्णी प्राचार्य एन.व्हि. चिन्मय विद्यालय शेगाव यांच्या अध्यक्षतेखाली, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता सुनीलजी थोटांगे साहेब यांच्या शुभहस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. रक्षाबंधन कार्यक्रमासाठी सौ वैशालीताई थोटांगे व सौ अनिताताई पाटील आजीवन सदस्य पतंजलि योगपीठ हरिद्वार ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. रमेशजी भट्टड यांची विशेष उपस्थिती होती. प्रल्हाद सुलताने प्रांत सह कोषाध्यक्ष यांनी प्रास्ताविकात भारताचे दुसरे राष्ट्रपती यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले याबाबत सविस्तर माहिती दिली. प्राचार्य किशोरजी कुलकर्णी राज्य स्वच्छता मॉनिटर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ.ह .भ. प. ज्ञानेश्वर मिरगे, राज्य पुरस्कार प्राप्त से.नि., मुख्याध्यापक प्रल्हाद सुलताने, राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त, मुख्याध्यापक प्रकाश झांबरे, सेवानिवृत्त अध्यापक वनश्री विठ्ठलराव मिरगे, हास्य कवी नितीन वरणकर सर, दीपक सरप सर ,हरिश चिंचोलकर सर ,सेवा निवृत्त वावगे सर, गजाननराव वानखडे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी ,श्रीकृष्ण घनोकार सर, प्रा. विलासजी डेहनकर सर, दिलिप इंगळे गटशिक्षणाधिकारी,हरिदास सोळंके सर, सुरेश लांबे सर ,प्राध्यापक रवींद्र पोटे सर ,डोंगरदास पालीवाल सर, अनंतराव मारोडे सर, योग शिक्षक विनायकराव भारंबे, चतुर्भुज मिटकरी, राजकुमारीताई भट्टड, रवींद्र हेलोडे,सौ ज्योतीताई लांबे, सविता इंदोरे ,सौ सुनीता चांडक, दिलीप गोहेल, अनिता तायडे, देवकाबाई मिरगे, यांचा सुनील थोटांगे व रमेशजी भट्टड, राजेंद्र शेगोकार, संतोषराव पाटील, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पदमिनी पिंपळे, प्रतिभा बगे, अर्चना शेळके, अनुपमा शितुत, वर्षाताई सरप, सविता इंदोरे, या भगिनींच्या हस्ते रक्षाबंधन करण्यात आले. सुनीलजी थोटांगे साहेबांचा 52 वा वाढदिवस पतंजली परिवारातर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होम हवन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पूजनाने झाली. प्रकाशजी झांबरे यांनी बधाई पर गीत गायीले. ज्ञानेश्वर मिरगे ,किशोरजी कुलकर्णी, सुनील थोटांगे साहेब, हरीशजी चिंचोलकर सर ,यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन वनश्री विठ्ठल राव मिरगे यांनी तर आभार प्रदर्शन नीलकंठजी साबळे यांनी केले.व शांतीपाठाने कार्यक्रमाचे समापन झाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button