क्राईमगुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगांव येतील रोकडीया नगरात चोरी

शेगांव येतील रोकडीया नगरात चोरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव खामगाव येथे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या महिलेचे शेगाव येथील पर अज्ञात चोरांनी फोडून घरातील ३ लाख ३८ हजाराचा मुद्यामाल लंपास केल्याची घटना २० मार्च रोजी दुपारी स्थानिक रोकडिया मधील महेश नगरात घडली.याबाबत असे की, कु. रिता भास्करराव काळे वय ३५ वर्षे रा. रोकडीया महेश नगर बजाज शोरूम “जवळ शेगाव (प्रदीप तुळशीराम दंदी यांचे भाड्याचे घर) ह्या पालटेक्नीक कालेज खामगाव येथे प्राध्यापिका आहेत. त्या २० मार्च रोजी सकाळी ११.३० वा घराला कुलूप लावूनघुटी साठी गेले असता घुटी संपल्यानंतर त्या दुपारी २.३० या घरी आल्या. यावेळी कंपाउंड चे गेटचे कुलूप उघडून आत आल्या असता घराचे दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले दिसले दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता खोलीतील दोन्ही लोखंडी कपाटाचे दरवाजे तुटलेले व कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले कपाटामध्ये ठेवलेलेनगदी २७ हजार रूपये दागीने, कानातले चार जोड सोन्याचे अंदाजे १५ ग्रॅम किंमत अंदाजे ७५ हजार मंगळसूत्र अंदाजे १२ ग्रॅम किंमत ६२हजार, सोन्याची अंगठी अंदाजे ५.५ ग्रॅम किंमत २५ हजार रुपये सोन्याची चैन ५० हजार, सोन्याची पोथ १० ग्रॅम किंमत ६० हजार, सोन्याची अंगठी २.५ ग्रॅम कीमत १५ हजार, छोटे पॅडल २५ ग्रॅम किंमत १० हजार चांदीचे जोडवे दोन जोड़ दोन तोरडया किंमत २ हजार, SAMSUNG GALAXY जे ५-६ कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाइल किंमत १२ हजार असा एकूण ३ लाख ३८ हजार रूपयेचा मुददेमाल लंपास केला. अशा फिर्याद वरून शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ३८० भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button