बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यात यावा- मनविसेची मागणी

 स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

नांदुरा: तालुक्यातील भोटा येथे खामगांव आगाराची बससेवा सद्यस्थितीत सुरू आहे, परंतु भोटा येथून जवळच असलेल्या कठोरा पर्यंत शेगांव आगाराची बससेवा सुरू आहे. सदर बसचा थांबा हा भोटा पर्यंत वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज दिनांक १५ जुलै २०२३ रोजी निवेदन दिले आहे. सदर बससेवा सुरू झाल्यास पंचक्रोशीतील भोटा, दादगांव, रोटी, हिंगणा इसापूर, हिंगणा खोंड, हिंगणा भोटा, कालवड, माहुली, टाकळी (पारस्कर) या गावांमधील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार नाही करिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकृष्ण भाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनात सदर निवेदन शेगाव आगार व्यवस्थापक मा.श्री गो. प्रा.जंजाळ साहेब यांना दिले आहे. सोबतच ग्रामपंचायत भोटा व हिंगणा भोटा गट ग्रामपंचायत मध्ये घेतलेला ठराव पण यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर , मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे, मनसे तालुका अध्यक्ष रविंद्र उन्हाळे, भोटा सरपंच सौ. सुनिता कडू भोटकर,भोटा उपसरपंच नितीन पुंडलिक पारस्कर,हिंगणा भोटा गट ग्रामपंचायत सरपंच सौ.छाया संजय उगले, उपसरपंच ज्ञानेश्वर खवले,भोटा ग्रा.सदस्य पंकज विश्वनाथ पारस्कर,ग्रा.सदस्या सौ पुष्पाताई नागोराव पारस्कर, कडू श्रीराम भोटकर, अभिषेक भारंबे सह मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक व भोटा हिंगणा भोटा रोटी येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button