गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

त्या पीडित मायलेकीच्या पाठीशी शिवसेना; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुखा प्रतिनिधी

चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर शिवारात शेतजमिनीच्या वादातून मारहाण झालेल्या पीडित सौ. उषाबाई रमेश साळवे व कु. प्रतीक्षा साळवे यांची आज (दि. ४) चिखली शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चिंचोले हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले-पाटील तसेच संपूर्ण शिवसेना पीडितांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांनी दिली.
यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, पीडित महिलांनी आरोप केला की, आरोपी शिवाजी किसन शिराळे हा स्वतःला युवा सेनेचा चिखली तालुका संपर्कप्रमुख असल्याचे सांगत खासदार, नेते व शिवसेनेचे नाव घेऊन त्यांना धमकावत होता.
याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांनी स्पष्ट केले की, “शिवाजी किसन शिराळे हा शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी नसून त्याच्याकडे पक्षाची कोणतीही अधिकृत जबाबदारी नाही. त्यामुळे शिवसेना त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही. आम्ही पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
तसेच, ना.प्रतापराव जाधव व आमदार श्वेताताई महाले-पाटील यांच्यावर होत असलेले आरोप निराधार व चुकीचे असल्याचे सांगत, या घटनेशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विलास घोलप यांनी पीडित महिलांना धीर देताना इशारा दिला की, “यापुढे पीडितांना धमकावण्याचा अथवा त्यांच्या शेतीत पाय ठेवण्याचा प्रयत्न संबंधित आरोपींनी केला, तर शिवसेना शहरप्रमुख या नात्याने आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ. पीडितांवर अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांना संपूर्ण संरक्षण मिळावे यासाठी शिवसेना खंबीरपणे उभी राहील.”
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख कल्पनाताई बोधेकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे, युवा सेना तालुका प्रमुख गोपीनाथ लहाने, युवा सेना विधानसभा संपर्कप्रमुख अनमोल ढोरे, युवा सेना शहरप्रमुख राजेश पवार, नीरज काकडे खासगी सचिव,शहर संघटक पंडितअण्णा जेठे,राका मेहेत्रे,शिवसेना उपतालुकाप्रमुख संदीप नरवाडे, विष्णू मेथे, अभि वीर, अमर काळे, विशाल इंगळे, महेश बोधेकर ,दीपक कळगे,पत्रकार छोटू कांबळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button