बुलढाणामहाराष्ट्र
शिवशंभो ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण ……

शिवशंभो ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण ……
(जी. डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)
खामगाव येथील सुप्रसिद्ध शिवशंभो ग्रुप यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहे. यावर्षी वृक्षारोपण चे काम गेल्या पंधरा दिवसापासून शिवशंभो ग्रुप चे कार्यकर्ते करीत आहेत. ग्रुपने मागील चार वर्षात जवळपास पंधरा हजार झाडे लावून त्यास यशस्वी संवर्धन केले आहे. त्यामध्ये सिंचन पाणी, वॉल कंपाऊंड , करून वृक्षाचे संगोपन केले आहे. यावर्षीचे वृक्षारोपण जनुना तलाव नजीक टेकडीवर जवळपास तीन हजार झाडे लावण्याचा बेत आहे.



