Press note ….

Press note ….
शेगाव शहर पोलिसांनी राबवली मोटर वाहन कायदा मोहीम….
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगांव पोलीस स्टेशन च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे ताश पत्ता जुगार खेळणारे 3 जुगारी , 2 वरली बहाद्दर व 1 दारू विक्रेत्याला पकडले…
तर मोटर वाहन कायदा चे विविध कलमांतर्गत केली प्रभावी कार्यवाही…..
मिळालेली माहिती अशी की आज दिनांक 15/7/2023 रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हिंगणा वैजनाथ येथील आरोपी मनोहर तुळशीराम बावणे वय 47 वर्षे याचेवर त्याचे घरासमोरील मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी दुपारी अंदाजे 03/20 वा. सुमारास दारूबंदी कायद्यांतर्गत छापा कार्यवाही करून त्याच्या जवळून वायरच्या थैलीमध्ये देशी दारू टॅंगो पंच 90 एम एल कंपनीच्या एकूण 25 नग सीलबंद शीशा 40 रुपये किमतीप्रमाणे वायरचे थैली सह 1010₹ चा दारुबंदीचा मुद्देमाल पंचनामा करून पुरा कमी जप्त केला आहे . आरोपीवर कलम 65 ड महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक 1244 गणेश वाकेकर हे करीत आहेत.
तसेच दुपारी 2/20 वाजता सुमारास ग्राम घुई येथील पाण्याचे टाकी खाली वरली मटका जुगार आकड्यांचा खेळ पैशांचे हारजीत वर खेळणारा जुगारी ईश्वर शेषराव इंगळे वय 33 वर्षे रा. घुई यास छापा कारवाई करून जागीच पकडले. त्याच्याकडून नगदी रुपये व वरली मटका जुगार साहित्य असा एकूण 855 /-₹ चा मुद्देमाल घटनास्थळ पंचनामा प्रमाणे जप्त करून त्याच्यावर कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक 1244 गणेश वाकेकर हे करीत आहेत.
तसेच ग्राम नागझरी येथील झोपडपट्टी मधील सरदार यांचे पान टपरी बाजूला सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे स्वीकारून वरली मटका आकड्याचा जुगार खेळ पैशांचे हार जितवर खेळणारा जुगारी संतोष रामकृष्ण नहाळे वय 42 वर्षे रा. मुडगाव तालुका अकोट हल्ली मुक्काम नागझरी यास छापा कार्यवाहीदरम्यान पकडून त्याच्या जळून नगदी रोख व वरली मटका जुगार आकड्यांच्या चिठ्ठ्या व इतर साहित्य असा एकूण 755/-₹ चा मुद्देमाल पंचनामा करून पुराव्या कामी जप्त करण्यात आला. आरोपीवर कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार 742 गजानन वाघमारे हे करीत आहेत.
तसेच 5/45 वा. सुमारास नवोदय विदयालय चे पाठीमागील मोकळ्या जागेत खदानला लागून एका झाडा खाली एक्का बादशाह नावाचा जुगार पैशाचे हारजीतवर खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर रेड करून त्यांचे पैकी तीन जुगारी इसम यांना जागीच पकडले इतर तिन ते चार जुगारी फरार झाले. पकडलेल्या आरोपींना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे
1) कुशक भिमराव तायडे वय 34 वर्षे रा. तायडे कॉलनी खामगाव 2) गणेश तुळशीराम गवळी वय 55 वर्षे रा. व्यंकटेश नगर शेगाव 3) अंकुश पुरूषोत्तम ठाकरे वय वर्षे रा. वाडी खामगाव असे मिळून आले. त्यांचे अंगझडतीत नगदी पैसे, 52 ताशपत्ते व त्यांचेकडे 2 मोटार सायकली व 1 स्कुटी असा एकुण नगदी व जुगार साहित्यासह एकुण 2,14,580/- रू चा मुद्देमाल घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे पुरावा कमी जप्त करण्यात आला. त्यात फरार आरोपीतांचे नाव बाबत चौकशी केली असता फरार आरोपी 1) लखन पिवाल 2) सचिन पाटील (कडाळे) 3) विनोद घुले सर्व रा शेगाव हे असल्याचे समजले. सदर प्रकरणी पोलिसांनी सर्वांवर कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्याचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश वाकेकर हे करीत आहे.
तसेच मोटर वाहन कायदा अंतर्गत केलेल्या कार्याबद्दल माहिती घेतली असता 1-अवैद्य प्रवाशी वाहतूक 6 केसेस, 2-No पार्किंग 38, 3-ट्रिपल सीट 22, 4-फ्रंट सीट 8, 5-No डाक्युमेंट 14, 6-No लायसेन्स 9, 6-
फ्रंट सीट 8, 7-सायलेन्सर 1, 8-मोबाईल च्या 6, 9-Sit बेल्ट 8, 10-विना नंबर प्लेट 5, 11-फॅन्सी नंबर प्लेट 2 केसेस करून एकूण दंड 1,96,700 रुपये आकारण्यात आला.
शेगाव शहरातील अवैध धंदे बंद झाल्यामुळे चोरट्या मार्गाने वरली मटका ताजपत्ता जुगार खेळ खेळणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे.



