Uncategorizedमहाराष्ट्रमुबई

शिवदत ज्ञान प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ दिवा आयोजित घे भरारी कार्यक्रम १०५ विद्यार्थ्यांचा गुणवंत सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

शिवदत ज्ञान प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ दिवा आयोजित घे भरारी कार्यक्रम १०५ विद्यार्थ्यांचा गुणवंत सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
दिवा – (सचिन शेलवले )
शिवदत ज्ञान प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ दिवा यांच्या संयुक्ताने विद्यमाने इ.१०वी व इ.१२वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दि.२८/०७/२०२३ रोजी अवधूत हाॅल दिवा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्या सौ. मंजूळा पाटील मॅडम (मुख्याध्यापिका) जे.के.पाटील स्कूल यांनी विद्यार्थ्यांना इ.१०वी इ.१२ वी नंतर पुढे कार्य करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्या सौ.केतकी साईनाथ म्हात्रे मॅडम (प्राध्यापिका लिलावाती काॅलेज) यांनी विद्यार्थ्यांना इ.१० वी व इ.१२ वी नंतरचे विविध कोर्सेस त्याची तयारी कशी करावी,व कोणत्या क्षेत्रात आपल्याला त्यामुळे जाता येईल याचे अभ्यासपूर्ण सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्रीराम चौधरी सर प्राचार्य (श्री गणेश विद्यामंदिर, दिवा ) यांची गुणवते बरोबरच संस्कारक्षम बना व देशाचे आदर्श नागरीक व्हा असे सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वीते साठी रोटरी क्लबचे अध्यक्ष.रो. हर्षद भगत, सचिव.रो.आदित्य पाटील, प्रोजेक्ट हेड.रो. साईनाथ म्हात्रे, रो.अभिषेक ठाकूर, रो‌ मोहित भोईर तसेच उपस्थित रो. स्वप्नील गायकर, मा.नंदु किणे, मा. प्रतिक बेडेकर, मा. युवराज बेडेकर,मा.किशोर पाटील, वैष्णव पाटील, श्री. अभिजित आलिमकर, मा.श्री. गजानन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
विशेष म्हणजे प्रचंड पाऊस असतांना सुद्धा या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक यांनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती दर्शविली. तसेच शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळाचे सदस्य श्री .दिनेश म्हात्रे , सौ.गीता म्हात्रे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सदर सुत्र संचालन सौ.ईश्वरी साळवी मॅडम व कु.ऋषिकेष मोहिते सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन रोटरीयन मा. श्री. किशोर पाटील यांनी उत्तम प्रकार केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button