मनोरंजनमहाराष्ट्रसांस्कृतिक

शिरसाळा मारोतीरायाच्या चरणी अडीच किलो चांदीची गदा अर्पण *

प्रतिनिधी सतीश बावस्कर.


बोदवड:- दि/26
मार्गशीर्ष महिन्याचा शुभारंभ झाला असून या महिन्यात शिरसाळा मारोती येथे मोठ्या प्रमाणात भाविक जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून हजेरी लावतात. ईच्छा पुर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी या धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शनिवारी भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील गोपीभाऊ राजपुत यांनी ढोल ताश्यांच्या गजरात वाजतगाजत अडीच किलो चांदीचा गदा शिरसाळा मारोतीराया चरणी अर्पण केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण बजरंग भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल, शिवसेना जळगांव महानगर प्रमुख शरदभाऊ तायडे , नगरसेवक तथा साईसेवक पिंटुभाऊ कोठारी , शेखर भाऊ सोनवणे , टायगर गृपचे तालुकाध्यक्ष अजय राजपुत यांच्यासमवेत साई मित्र परिवार मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button