Uncategorizedमहाराष्ट्रशैक्षणिकसांस्कृतिक

वेडवहाळ येथील आधारकार्ड कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी :- देविदास भोईर – अघई

अघई- पिवळी विभागातील नागरिकासाठी मौजे वेडवहाळ येथे भव्य आधारकार्ड व इतर शासकीय दाखले तयार करणे बाबत कॅम्पचे आयोजन केले होते, अघई- पिवळी विभागात आधारकार्ड संदर्भात कामे करण्यासाठी 20 ते 30 किलोमीटर शहराच्या ठिकाणी जाऊन करावी लागत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ,महीला व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ह्या संदर्भात नवनिर्वाचित ग्रुप ग्रामपंचायत टहारपुर सदस्य देविदास विठ्ठल भोईर व सचिन शेळवले (शिक्षक) यांचा सहकार्याने भव्य दोन दिवसीय आधारकार्ड शिबिराचे आयोजन केले होते.

अघई तानसा विभागात ह्या अगोदर ई -श्रम कार्ड नोदणी, शासकीय दाखले वाटप शिबीर, PM Kisan EKYC व शेतकरी विमा उतरवण्याची कामे कॅम्पच्या माध्यमातून केली आहेत तसेच विभागांतील 42 मेहनती शेतकऱ्यांना ११ जातीतील 3000 फळझाडे वाटप करण्यात आली आहेत. कार्यक्रम आयोजनसाठी परेश थोरात,राकेश पवार, विशाल बराटे, ज्योत्स्ना देसले,अविनाश भोईर, रामदास सोनावणे,गणपत भोये, मोहन भुसारे,दिनेश भोये ,बंडू जाधव, विनोद सु.भोईर, ज्ञानेश्वर चौधरी,उमेश घागस,रुपेश चौधरी, तुषार चौधरी,सागर केंगवडे, महेंद्र केंगवडे, युवराज घागस,राम भोये,विलास वाघ,शैलेश जाधव ,प्रणित पाटील,विशाल धापटे यांनी प्रचंड मेहनत घेतली असून २०० लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी फाउंडेशन कर्मचारी विद्या गोरस्कर, निमी शहा, रविंद्र हरणे (सरपंच) अविनाश पाटीलसर,योगेश नीपूर्तेसर (शिक्षक) रविंद्र वाघचौडे (ग्रामसेवक) महीला मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button