महाराष्ट्रविदर्भ

पळशी सुपो सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पारित

प्रतिनिधी रामा इंदोरेअविश्वास ठराव पारित झाल्यानंतर विजयी जल्लोष करतांनासरपंच लीला सुरेश ठाकरेयांच्याविरुद्ध अविश्वास ठरावपळशी सुपो : जळगाव जामोद तालुक्यातील तीर्थक्षेत्र पळशी सुपो या १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत चे शुक्रवारी पारित झाला. तहसीलदार, मंडळ अधिकारी, पटवारी तथा ग्रामविकास अधिकारी यांच्यासमक्ष १० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. सरपंच ठाकरे यांच्यासह तीन सदस्य अनुपस्थितहोते. यावेळी उपसरपंच पंचफुला सुरेश दाभाडे, सदस्य सर्वश्री शरद कोकाटे, विष्णू चांभारे, विशाल राखोंडे, प्रशांत शेगोकार, अनिता साईनाथ शिंदे, माधुरी उमेश कोकाटे, अलका मधुकर कोकाटे, नंदा गणेश काकडे, रिंकी उदिराम जमरा हे १० सदस्य हजर होते. अध्यासी अधिकारी म्हणून जळगाव जामोदच्या तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील तथा ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button