शेगाव खामगाव रोडवर भीषण अपघात

दोन बस अन् बोलेरोच्या धडकेत ५ ठार, २४ जखमी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव। आज पहाटे ५.३०
वाजताच्या सुमारास खामगाव नजीक जयपूर लांडे फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हा अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले आहेत. जखर्मीपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून त्यांचेवर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. एसटी बस, खासगी प्रवासी बस आणि बोलेरो या वाहनांची धडक होऊन हा तिहेरी अपघात झाला आहे.
मिळालल्या माहितीनुसार,
वाहने चक्काचूर भरधाव वाहने एकमेकांना धडकून
झालेल्या या अपघातात बोलेरो कारचा अक्षरशः चुराडा झाला असून एसटी महामंडळाच्या बससह खासगी बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी सदर अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सदर अपघातामध्ये बोलेरो मधील धनेश्वर मरावी रा.मध्य प्रदेश, कृष्णकुमार मोहन सिंह सरोते वय २० वर्ष, शिवपाल, शिवाजी समाधान मुंडे वय ५५ वर्ष रा.एसबीआय कॉलनी शेगाव व इंद्राणी ट्रॅव्हल्स मधील मेहरुनिसा शेख हबीब वय ४५ वर्ष रा. धुळे मालेगाव असे एकूण चार पुरुष व एक महिला मयत झाली आहे.



