राजकीय

आमदार अँड फुंडकर व खासदार जाधव यांनी झेंडी दाखवून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस झाली रवाना

आमदार अँड फुंडकर व खासदार जाधव यांनी झेंडी दाखवून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस झाली रवाना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे खामगाव ::- आमदार अँड आकाश फुंडकर व खासदार प्रतापराव जाधव यांनी झेंडी दाखविल्यानंतर पंढरपूर साठी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी रवाना झाली. आज 26 जून रोजी दुपारी 12 वाजता ही पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. आ अँड आकाश फुंडकर यांनी या विशेष रेल्वेचे पूजन केले. त्यानंतर आ अँड फुंडकर व खासदार प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली व पंढरीच्या दिशेने रेल्वे रवाना झाली. यावेळी आ अँड फुंडकर यांनी वारकऱ्यांच्या भेटी घेतल्या व त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पांडुरंगाचा जयघोष करण्यात आला. मोठया भक्तिमय वातावरणात ही एक्सप्रेस रवाना झाली.यावेळी भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, महेंद्र रोहनकार, राजेंद्र धनोकार, प्रदेश भाजप सदस्य सौ अनिताताई देशपांडे, सौ जान्हवी कुलकर्णी, सौ शिवानी कुलकर्णी, गणेश जाधव, सुरेश घाडगे, संजय घोगरे, अशोक हटटेल, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, नगेंद्र रोहनकार, रवी गायगोळ, प्रसाद एदलाबादकर, मयूर घाडगे, संतोष येवले, विक्की हट्टेल, कमलेश हवेलीया, आकाश बडासे, रोशन गायकवाड, निकुंज मंदाणी, आदी भाजप पदाधिकारी यांचेसह शिवसेनेचे संजय अवताडे, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button