जळगावा जिल्हापत्रकारमहाराष्ट्रमुबईविदर्भसंपादकीयसामाजिकसांस्कृतिक
आदिवासी महिला राष्ट्रपती असून काय उपयोग?

जळगाव जिल्ह्यातील प्रतिभाताई पाटील या कांग्रेस कडून राष्ट्रपती बनल्या.नव्हे बनवले.कांग्रेस पक्षाने खूप शेखी मारली.मी जळगाव शहरातील माणूस.आमच्या राष्ट्रपती.महिला राष्ट्रपती.खूप कौतुक झाले.पण त्यांनी राष्ट्रपती पदावरून कोणताही निर्णय महिलांबाबत घेतला नाही.किंवा जळगाव जिल्हा बाबतीत घेतला नाही.उलट दिल्ली हून परत पुण्याला येतांना चुकीचे काम केले.कोणालाही आवडले नाही.
आता महामहिम द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत.भाजपकडून.महिला राष्ट्रपती.आदिवासी राष्ट्रपती.पण काय उपयोग?जेंव्हा मणिपूर मधील तीन महिलांवर लैंगिक व शारीरिक अत्याचार झाले तेंव्हा या महिला असूनही चूप का?या आदिवासी असूनही चूप का? त्यांना याचा राग संताप आलाच नाही कि वेदना, संवेदना झालीच नाही?
राष्ट्रपती हे पद देशाचे प्रमुख पद असते.ते जरी भाजप कडून राष्ट्रपती बनले असले तरीही ते आता भाजप चे नाहीत. ते देशातील सर्व नागरिकांचे अग्रस्थानी नागरिक आहेत.पालक आहेत.असे संविधान सांगते.राष्ट्रपती उच्चशिक्षित असल्याने त्यांना संविधान मी सांगण्याची गरज नसावी.तरीही त्यांना मणिपूर मधील शोषित,पिडीत आदिवासी महिलांबाबत काहीच कसे वाटू नये?
राष्ट्रपती यांचेकडे कायदा करण्याचा अधिकार नसला तरीही कायदा अंमलबजावणी करण्याचा सर्वोच्च अधिकार तर नक्कीच आहे.जे सुप्रीम कोर्टाचाही निर्णय फिरवू शकतात.रद्दबातल करू शकतात.फासी जाणाऱ्याला जिवदान देऊ शकतात.तर आता ते प्रधानमंत्री आणि गृहमंत्री चा निर्णय का फिरवू शकत नाही? मणिपूर मधे राष्ट्रपती राजवट का लागू करीत नाहीत?
माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसींग जरी कांग्रेस कडून पदावर आले होते.तरीसुद्धा त्यांनी कांग्रेस प्रधानमंत्री राजीव गांधींना मर्यादा आणली होती. शालेय शिक्षण कमी असले तरी ते खूप बुद्धिमान, विद्वान ,संवेदनशील,धाडसी, कर्तव्यदक्ष होते.पदाचा यथावत योग्य वापर त्यांनी केला होता.तसेच निलम संजीव रेड्डी सुद्धा खरोखरचे राष्ट्रपती होते.महामहिम द्रौपदी मुर्मू कधी राष्ट्रपती च्या भुमिकेत येतील ?कधी महिलेच्या भुमिकेत येतील?कधी आदिवासींचे तारणहार बनतील?
एरवी एससी, एसटी,ओबीसी, मुसलमान भाजप विरोधात खूप आग ओकत असतात.पण भाजपची सावली सुद्धा ओलांडण्याचे धाडस करीत नाहीत.भाजपचा निर्णय किंवा आदेश ओलांडणे दूरची गोष्ट.कितीही आक्रस्ताळेपणा केला तरीही समोर येऊन लढण्याचे धाडस होत नसेल तर स्वताचे पोवाडे गाऊन घेणे करमणूक ठरते.पोरखेळ ठरतो.राणा भीमदेवी आणा,बाणा,घोषणा करून काय उपयोग? कदाचित आमच्या दातात विष असावे म्हणून आम्ही लाकडाचा दगडाचा चावा घेतो.माणसाचा घेतला तर मारून टाकतील,अशी भीती स्वताला मारून टाकते.आम्हाला शत्रू मारत नाहीत.आम्हीच आम्हाला मारून टाकतो.हिच तर आत्महत्या ठरते.आत्महत्या म्हणजे मानेला फास लावून मरणे नव्हे.ती शरीराची हत्या असते.खरे तर आम्ही आमच्या आत्म्याला कधीच मारून टाकलेले असते.आत्महत्या आधी करतो नंतर देहहत्या.अशी आत्महत्या केलेली माणसे चालते फिरते कंकाल असतात.ना वेदना ! ना संवेदना !
… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



