बुलढाणामहाराष्ट्र

विषारी पाणी पिल्याने किडणी रुगणात झपाट्याने वाढ. बंद केलेला पाणी पुरवठा सुरू करा अन्यथा आंदोलन!प्रशांत डिक्कर जळगाव

*विषारी पाणी पिल्याने किडणी रुगणात झपाट्याने वाढ.*

*बंद केलेला पाणी पुरवठा सुरू करा अन्यथा आंदोलन!प्रशांत डिक्कर*जळगाव : (ता.प्र.) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यांनी गेल्या १ महिन्यांपूर्वी १४० गाव पाणी पुरवठा योजनेचे संग्रामपूर जळगाव तालुक्यातील ६० गावचा पिण्याचा बंद केलेला पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी ७ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा जळगाव म.जि.प्रा.विभागाला निवेदनातुन दिला आहे. संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील क्षारयुक्त पाणी पिल्याने शेकडो नागरिकांना किडणीचे आजार होऊन मृत्यू झाले आहेत. हजारोंच्या संख्येने किडणीग्रस्त उपचार घेत आहेत. अशातच अचानक १ महिन्यांपूर्वी म.जि.प्रा‌.विभागाने संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील ६० गावचा वाण धरणातुन होत असलेला पिण्याचा पाणी पुरवठा बंद केला असल्याने नागरिकांना विषारी (क्षारयुक्त) पाणी प्यावे लागत आहे. अनेक गावांमध्ये निकृष्ट दर्जाची पाईप लाईन तर काही गावात पाणी टाकी बांधकामात घोळ घालून ठेवल्याने बऱ्याच गावात पाणी पोहचत नाही. हि वस्तुस्थिती आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेचे भयान वास्तव निर्माण झाले आहे. एक महिन्यापासून साठ गावांमधील पाणीपुरवठा बंद असुनही लोकप्रतिनिधी बोलत नाहीत. व प्रशासकीय अधिकारी वसुलीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना विशयुक्त पाणी पिण्यासाठी भाग पाडतायत. करीता १४० गाव पाणी पुरवठा योजनेचे नियमित पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी ७ फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन उभारून जणसामान्यासाठी आर या पारची लढाई लढणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी निवेदनातुन दिला आहे. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सय्यद बाहोद्दीन,विलास इंगळे, अविनाश वाघ,समाधान धुर्डे, स्वप्निल भगत, विष्णू पाटील, शुभम वाघ, सह बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button