बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वरवट बकाल येथे आज महाराजस्व शिबिराचे आयोजन

वरवट बकाल येथे आज महाराजस्व शिबिराचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरसोनाळा अपंग निराधार वगोरगरिबांसाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संग्रामपूर तहसिल प्रशासनाचे वतीने शनिवार २५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता सहकार विद्यामंदिर वरवट बकाल येथे एक दिवसीय महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे अध्यक्षस्थानी जळगाव जा. मतदार संघाचे आ. डॉ. संजय कुटे हे राहणार आहेत. तर जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांचे हस्ते उदघाटन होणार आहे. जि.प.चे आति मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, जिल्हा कृषी अधिक्षक विजय बेतीवार, एसडीओ मनोज देशमुख जळगाव जा. तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, पंस कृषी अधिकारी संदिप साळवे, तहसिलदार मुरली गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद रोजतकर, बाल प्रकल्प अधिकारी श्रीमती इंगळेसह सर्व निभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या शिबीरात अपंगांना वैथाकिय तपासणी करून प्रमाणपत्र जिल्हा शल्प चिकित्सक पथकाकडून वाटप होणारआहे. त्यावेळी सातपुड्यातील अपंग, वृद्ध निराधार, विधवा, परितक्त्या व तालुक्यातील सर्व पात्र लाभार्याना निराधार पेन्शन वाटपाचे पत्र व पूर्व संमती पत्र वाटप होणार आहे.सर्व अपंगांना व आदिवासी वृद्धांनाने आण ८ शासकीय वाहनाने करण्यात येणार आहे. सातपुडयात ५८ अपंगांना येथे आणण्यात येणार आहे. या शिबीरात शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान वाटप होणार आहे. या कार्यक्रमासाठी बुलढाणा अर्बन परिवार व संग्रामपूर मित्र परिवार आघाडीचे अध्यक्ष शंकर पुरोहित प्रशासनास मोलाचे सहकार्य करित आहेत. गत दिवसापासून संग्रामपूर तहसिल प्रशासन सातपुड्याच्या घरोघरी फिरून शासनाच्या योजनेपासून वंचित पात्र लाभार्थी हुडकून काढत आहेत. या शिबीरातून सर्वात जास्त लाभ दुर्लक्षित आदिवासी यांना होणार आहे. यासाठी उपस्थित रहण्याचे आवाहन तहसिलदार मुरली गायकवाड यांनी केले आहे. या शिबीराच्या माध्यमातून प्रथमच गोरगरिब वंचित व आदिवासी यांचेसाठी विकासाचे महाद्वार उघडल्या जाणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button