नागपूर-पुणे एक्स्प्रेसह तीन गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा●

शेगाव : प्रतिनिधी येथे श्री संत गजाजन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी, यासाठी अकोला स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर – पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी केला जाण्याची शक्यता आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर- पुणे-नागपूर एक्स्प्रेस (क्रमांक २२१४१ / २२१४२) ३१ मार्चपासून पुढील सहा महिनेशेगाव स्थानकावर थांबणार आहे. गाडी क्रमांक १२४२२ अमृतसर-नांदेड एक्सप्रेसला २८ मार्चपासून तर १२४२१ नांदेड-अमृतसर एकस्प्रेसला २९ मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबा असणार आहे. गाडी क्रमांक १२७५२ जम्मुतावी नांदेड हमसफर एक्स्प्रेस २७ मार्चपासून, तर गाडी क्रमांक १२७५१ नांदेड- जम्मतावी हमसफर एक्सप्रेस ३१ मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबणार आहे.विभागाच्या दरम्यान, गोंदिया ते कोल्हापूर या दरम्यान धावणारी गाडी क्रमांक ११०३९ व ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ आणि २८ मार्चपासून जलंब स्थानकावर थांबणार आहे.( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)



