बुलढाणा

विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान


मलकापूर प्रतिनिधी:-
जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात बुलढाणा जिल्हयातील मलकापूर तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षक श्री. सुरेश आत्माराम सैंदाणे सर जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा हिंगणा काझी, तालुका मलकापूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्कार श्री. एन जे फाळके साहेब (गटशिक्षणाधिकारी मलकापूर) यांच्या वतीने श्री. नंदकिशोर शिंदे साहेब ( शिक्षण विस्तार अधिकारी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला अतुल पाटील सर, अमित राजपूत सर, भराड मॅडम, बोधने सर (साधन व्यक्ती) शेगोकार मॅडम, ठाकरे मॅडम, केने मॅडम, आम्रपाली मॅडम, मयुरी मॅडम, तथा विनोबा भावे शिक्षक सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रम चे (जिल्हा समन्वयक) शेख नजीर उपस्थित होते.
शिक्षण विस्तार अधिकारी मा.नंदकिशोर शिंदे सर यांनी पुढील कार्यास सुरेश सैंदाणे सरांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button