मलकापूरशेती

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
सिरसगाव शिवारातील घटना

मलकापूर प्रतिनिधी

वर्धा शेतात काम करीत असताना विजेचा जोरदार धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सिरसगाव धनाडे शिवारात घडली. जनार्दन केशव उघडे वय ५५ रा. सिरसगाव, असे मृताचे
नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी जनार्दन उघडे यांचे गावालगत शेत आहे. नेहमी प्रमाणे ते सकाळी शेतात गेले. शेतात काम करीत असताना त्यांना वीजप्रवाहित तारेचा स्पर्श झाला. यात ते गंभीर जखमी झाले. ही बाब परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी डॉ. तृप्ती दमड यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button