विजवितरण कंपनी खामगाव व चेतन फुंडकर पिंप्री गवळी यांच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून शेतकरी यांची जलसमाधी किंवा आत्मदहन, पॉइझन घेऊन आत्महत्या करण्याबाबत लेखी तक्रार व चेतन फुंडकर यांनी राजेंद्र बघे यांच्या वर केलेले आरोप शेतकरी यांनी फेटाळले

.(प्रतिनिधी. राजेंद्र मुंडे )
जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब जिल्हा बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब व उपविभागीय अधिकारी खामगाव रामेश्वर पुरी साहेब यांच्या कडे दिनांक २४/०३/२०२६ रोजी तक्रार देण्यात आली.
तक्रारदार शेतकरी प्रभुदास शालिग्राम पुराने व सहदेव पिंपळकार, ईश्वर काळे, संतोष वरुडकर, विकास देशमुख, मानिकराव देशमुख, गजानन नारायण डवंगे, पुरुषोत्तम राजाराम हाडोळे, अनंता महादेव शामसुंदर, शालीग्राम पुराने, गोपाल गणपत लोखंडे, यशोदा पुराणे, रवींद्र वीजय काळे, राजू डोंगरे, शंकर गोळे, राजु पुराणे, कुष्ण पुराणे, चंद्रभान काटोने, रामभवनसिह सुरतसिंह ठाकुर, शेख रशीद शेख कासम शेख खलील, शेख अब्बास, शेख युसुफ शेख महबुब सागरसिंह हनुमानसिंह पवार, मोहन वरुळकार, किशोर मनोहर काळे नितीत सुरोसे आदीं पिंप्री गवळी येथील शेतकरी यांनी लेखी तक्रार केली आहे.
महोदय वरील विषयास अनुसरून आपणाकडे तक्रार सादर करण्यात येते की वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराला कंटाळून त्रस्त शेतकरी हवालदिन झाला आहे.
त्याचे कारण महोदय असे की आम्ही पिंपरी गवळी शिवारामध्ये धरणामधून पाणी घेऊन शेती बागायती करतो परंतु पाणी भरपूर असताना वीज कमी पडते रोहित्र वारंवार जडत असल्यामुळे आम्ही वेळोवेळी आंदोलन करून अतिरिक्त नवीन डीपीची मागणी केली आणि ती खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कामगार मंत्री मा. ना. आकाश दादा फुंडकर यांचे निधीतून जिल्हा नियोजन मधून मंजूर सुद्धा झाली दोन महिने आधी डीपी लागली सुद्धा परंतु काही राजकारणी त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी गवळी येथील चेतन फुंडकर व जितेंद्र कुयरे वीज वितरण कंपनी अधिकारी यांच्यावरती वरती प्रेशर टाकून आमची डीपी काढण्यास भाग पाडत आहे, याच्या आधीही खूप असे शेतकऱ्या विरोधी यांचे प्रकरण आहेत अशातच एक शहापूर येथील मेतकर यांच्या शेतामधील अत्यावश्यक मंजूर झालेली डीपी सुद्धा शेतकऱ्याच्या शेतात बसता बसता यांनी प्रेशर टाकून बोथा शिवारात खाटीक यांच्या शेतात आवश्यकता नसताना टाकायला लावली होती, या प्रकरणात सुद्धा असेच चालू आहे, आम्ही वेळोवेळी केलेले आंदोलन व मागणीप्रमाणे आमच्या डीपीचा सर्वे होऊन आम्हाला आमची डीपी मिळाली परंतु कर्मचारीच्या हळगजीपणामुळे डीपीचे नाव धरण डीपी ऐवजी भगत डीपी असे करण्यात आले, आम्ही शेतकऱ्यांनी डीपीचे नाव चुकल्याची कर्मचाऱ्याला तेव्हाच कल्पना सुद्धा दिली होती परंतु कर्मचारी वरिष्ठ अधिकारी यांनासुद्धा कडविले होते परंतु वरिष्ठ अधिकारी म्हणाले काही होत नाही, सर्व इस्टिमेट सर्व डॉक्युमेंट मुळे डीपी सुद्धा मंजूर झाले परंतु पिंपरी गवळी गावातील सामान्य शेतकऱ्याची प्रति रोष असलेले चेतन फुंडकर यांच्या तक्रारीमुळे संपूर्ण वाद निर्माण झाला धरण डीपी बसली तेव्हा भगत डीपीचा कुठलाही मागणी झालेली नव्हती व स्पोर्ट पंचनामा व सर्वे झालेला नव्हता परंतु कर्मचाऱ्यांच्य हलगर्जीपणामुळे धरण डीपीयुजी भगत डीपी करण्यात आली त्याचा कंजूमर क्रमांक सुद्धा धरण डीपीलाच मिळतो व सर्वे सुद्धा इथेच झालेला आहे व आमची डीपी नियमाप्रमाणे आम्हाला मिळाली सुद्धा परंतु वरिष्ठ अधिकारी खालील कर्मचाऱ्यावर प्रेशर आणून डीपी काढण्यास भाग पाडत आहे, आमचा सर्व उदरनिर्वाह शेतीच्या भरोशावर आहे. आम्हाला नवीन डीपी मिळाल्यामुळे व पाणी मुबलक असल्यामुळे आम्ही व्याजाने कर्ज काढून शेती बागायती केलेली आहे. आमचा उदरनिर्वाह शेतीवरती आहे आणि आमचा जीवनमरणाच्या प्रश्न आहे. परंतु दोन-तीन दिवसापासून वीज वितरण कर्मचारी व अधिकारी आमच्या डीपी वरती येऊन डीपी काढून नेण्याची भाषा करीत आहे. आम्ही जिवंत असेपर्यंत डीपी काढू देणार नाही तरीसुद्धा शासन प्रशासन आमच्यावरती बळाचा वापर करून आमची डीपी काढून नेल्यास आम्ही शेतीला ज्या धरणामधून पाणी घेतो व आमच्या शेतीला देतो त्याच धरणामध्ये आम्ही जलसमाधी घेऊ, किंवा आत्मदहन पॉयझन घेऊन आत्महत्या करू त्याला कारणीभूत वरिष्ठ अधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने खामगाव कार्यकारी अभियंता जस्मितिया साहेब बुलढाणा येथील AC अधिकारी खटके साहेब, खामगाव येथील चौकशी अधिकारी उपकार्यकारी अभियंता सचिन कुमार मुंडे साहेब व इतर संबंधित अधिकारी कर्मचारी.व अधिकाऱ्यावर प्रेशर आणणारे मुख्य सूत्रधार ज्यांनी वेळोवेळी शेतकऱ्याला त्रास देऊन नुकसान केलेले आहे, असे जितेंद्र कुयरे तसेच त्यांचा सहकारी चेतन फुंडकर व त्यांचे सहकारी मृत्यूस झाल्यास हेच कारणीभूत असतील याकरिता आमच्या जीवित्वाची हानी झाल्यास वरील अधिकारी कर्मचारी व पुढारी यांच्या वरती पोलीस कारवाई व्हावी व आमच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी यांच्या वरती टाकावी हीच नम्र विनंती.
पुढील काही दिवसात प्रतिलिपी असलेले महाराष्ट्र राज्यातील मंत्री महोदयांना सर्व शेतकरी उपस्थित राहून तक्रार देणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब
शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री महाराष्ट्र मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब
श्रीमती सुनेत्रा ताई पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.ना प्रतापराव जाधव साहेब
कामगार मंत्री खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. ना. आकाश दादा फुंडकर साहेब
पालकमंत्री बुलढाणा जिल्हा मा. ना मकरंद आबा पाटील साहेब
मा. ना. अतुल जी साबे साहेब ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य.



