बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वाढदिवसानिमित्त ३५ हजार वह्यांचे वाटप; पुरषोत्तम खेडकर यांचा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : राजेंद्र मुंडे खामगांव

खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम खेडकर यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.

वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तूंऐवजी वह्या व शैक्षणिक साहित्य भेट द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३५ हजार वह्या आणि मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य भेट दिले.

जमा झालेले साहित्य स्वतःकडे न ठेवता पुरुषोत्तम खेडकर यांनी खामगाव तालुक्यातील २२० हून अधिक जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला

शिवाजी क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून तसेच गजानन पाटील, निलेश पाटील आणि निखिल पाटील यांच्या सहकार्याने ढोरपगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले

या कार्यक्रमाला पुरुषोत्तम खेडकर, गजानन पाटील, निलेश पाटील, निखिल पाटील दीपक पाटील, मंगेश पुंडे, सोपान मुंडे सागर डांगे धनंजय खेडकर, भागवत तायडे, व शाळेतील शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या उपक्रमामुळे वाढदिवस सामाजिक उपयुक्ततेने साजरा करण्याचा प्रेरणादायी संदेश समाजात पोहोचला असून, विद्यार्थी आणि पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button