गुलाल आमचाच,. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
गुलाल आमचाच,. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा. अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघ निवडणुक, मतदानाला शेगाव मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद. महा विकास आघाडी व भाजप आमने-सामने.अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी बुलडाणा जिल्ह्यातील ५२ केंद्रावर मतदानाला आज सुरुवात झाली. २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार असल्याने, या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.शेगाव मध्ये सुद्धा आज सकाळपासूनच पदवीधर मतदारांचा, मतदान करण्याकरिता उत्साह दिसून येत होता.भाजप,महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मतदान बूथ लावण्यात आले असून तीनही पक्षाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते बूथवर उपस्थित होते. प्रत्येक पक्षाच्या वतीने आपलाच उमेदवार निवडून येईल, असा दावाही यावेळी करण्यात आला .



