बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वरूर जऊळका ते पंढरपूर पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन

महेंद्र कराळे हिवरखेड :
संत नगरी वरुर जऊळका योग योगेश्वर संस्थान संत गजानन महाराज मंदिर ते महाक्षेत्र पंढरपूर पादळ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
योग योगेश्वर संस्थान मधील संत गजानन महाराजांच्या मुखवटा व पादुका या पायदळ दिंडी सोहळ्याने यावर्षीपासून पंढरपूर येथे नेण्याचे आयोजन करण्यात आले असून 20 जून तारखेला दिंडी सोहळ्याचे प्रस्थान आहे दिंडी प्रस्थानाला सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ह भ प श्री मोहन महाराज मेतकर यांचे कीर्तन होईल दिंडी प्रस्थानाला बाहेरगावा वरुन येणाऱ्या भाविकांना विदर्भ गाथा पारायण समिती च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादानंतर लगेच दुपारी दोन वाजता दिंडीचे प्रस्थान होईल व श्रींच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्याकरता पंचक्रोशीतील सर्व भक्तांची मांदीआळी जमणार आहे पायदळ दिंडी सोहळ्यामध्ये जे वारकरी सहभागी होणार आहेत त्यांच्या जवळून दिंडीमध्ये सहभागी होण्याकरता व पंढरपूर येथे मुक्कामाचे ठिकाणी राहण्याकरता कुठल्याही प्रकारची फी स्वीकारली जाणार नाही
अरुण महाराज लांडे, वासुदेव महाराज खोले गुरुजी यांच्या आशीर्वादाने दिंडी सोहळ्याची सुरुवात होईल तर दिंडी चालक म्हणून अवधूत महाराज पारसकर आहेत दिंडी सोहळ्या मध्ये गायक, वादक ग, विलास महाराज कराड, वैभव महाराज वसु, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे
विणेकरी विश्वनाथ महाराज गीते, रामेश्वर महाराज गाढे, वैभव महाराज वसु आहेत पालखी प्रस्थान सोहळ्याला श्रीधर महाराज अवारे, ज्ञानेश्वर महाराज नावकार, मोहन महाराज मेतकर, वैभव महाराज वसू, अशोक महाराज राजगुरू, अंबादास महाराज अवारे, रविंद्र महाराज केंद्रे, सोपान महाराज काळुसे, मधुकर महाराज ठाकरे, मंगेश महाराज ठाकरे, सुनिल भाऊ राजगुरू, विनोदभाऊ नायसे, विष्णु महाराज अवारे, रामदास महाराज जंजाळ, संतोष पा. अवारे, पंजाबराव सिरसाठ, गणेशराव रौंदळे, दत्ता पा. ओळंबे, शैलेश चराटे, कुलदीप पाटील वसू, गणेशराव कराड, अरुणभाऊ ईपर, राजू भाऊ नागमते, चेतन डोयफोडे, धिरज भाऊ सिरसाठ, ज्ञानेश्वर ठाकरे, बंडुभाऊ सिरसाठ, मनोहर पाटील लोडम, अंशुमन महाराज आणि परमहंस परशराम महाराज भक्त मंडळ पिंपळोद हे उपस्थित राहणार आहेत.दिंडी व्यवस्थापक मंडळ: गणेश महाराज शेटे, रतन पाटील वानखडे, भास्कर महाराज बहाळ, किसनराव वरहीकर, विनायकराव शेटे, संदीप रामेकर, अनंता पाटील हींगणकर.दिडी चोपदार: वामनराव महाराज नारे, चोरे महाराज.पालखी नियोजन, रामेश्वर महाराज गाढे, गजानन मोडक.
गायनाचार्य व मृदंगाचार्य: सोपान महाराज उकर्डे, विक्रम महाराज शेटे, विलास महाराज कराड, प्रविण महाराज कुलट, गजानन म. येरोकार, नंदू महाराज शिंदे, माऊली महाराज, संतोष महाराज पुगे, गोपाल महाराज नारे, पुरुषोत्तम महाराज रौराळे, विठ्ठल महाराज केंद्रे, शंकर महाराज सानप, अरुण महाराज सानप, प्रविण महाराज टिंगरे, दिवाकर पाटील गावंडे, बंडू महाराज गावंडे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, प्रसाद महाराज कुलट, अमोल महाराज कुलट, कार्तिक महाराज झामरे, पांडुरंग महाराज नळे, निखिल महाजन गोबरे, सतीश महाराज राजगुरू आदी मान्यवर सेवा देणार आहेत .भक्तीच्या या महोत्सवात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button