बुलढाणामहाराष्ट्र

*गो. से. महाविद्यालय खामगाव येथे संत गाडगेबाबा यांची जयंती रासेयो द्वारा उत्साहात साजरी

*गो. से. महाविद्यालय खामगाव येथे संत गाडगेबाबा यांची जयंती रासेयो द्वारा उत्साहात साजरी

*खामगाव: स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालितगो.से.विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे स्वच्छतेचे कैवारी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वच्छतेचा मंत्र देणारे आणि समाज प्रबोधन अनुरूप दशसुत्री प्रमाणे भुकेलेल्यांना अन्न , तहानलेल्याना पाणी , उघड्या नागड्याना वस्त्र, गरीब मुलांना शिक्षण , अंध रोग्यांना औषध उपचार, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय , गरीब तरुण-तरुणींचे लग्न, बेघरांना आसरा आणि दुःखी व निराशांना हिम्मत अशी दशसूत्री वाचन करीत समाजाला वैचारिक दृष्टिकोन देऊन डोळसपणे जगण्याची शिकवण देणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंतीचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात पार पडला. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवनकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले , सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. नीता बोचे सोबत सह कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन शिंगणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्ग कार्यक्रमाला उपस्थित सदर कार्यक्रमासाठी कु. प्रियंका हेमंत नेटके, कु. वैष्णवी उचाडे, कु. वैष्णवी ठाकरे, यश सावधेकर ,ऋषिकेश वाघमारे, आनंद निकाळजे यांनी परिश्रम घेतले.मा संपादक दै. …………आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये कृपया सदर बातमीला प्रसिद्धी देऊन उपकृत करावेप्राचार्य गोसे महाविद्यालय, खामगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button