बुलढाणाविदर्भ

गो ग्रीन फाऊंडेशन द्वारा भव्य रक्तदान शिबिर.

*गो ग्रीन फाऊंडेशन द्वारा भव्य रक्तदान शिबिर.* *शेगाव* आज दि.२६/०२/२०२३ रोजी सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे गो ग्रीन फाऊंडेशन द्वारा भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. १ मे २०१९ रोजी गो ग्रीन फाऊंडेशन ची स्थापना वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच पर्यावरण पूरक उपक्रम; विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली होती.आज पर्यंत शेगाव शहर व परिसरामध्ये गो ग्रीन फाउंडेशन मार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंग; कोरोना सारखे काळात कोरोना योद्धांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना चहा नाश्ता व जेवणाचे मोफत वाटप करण्यात आले.पर्यावरण पूरक उपक्रम म्हणून शाडू माती पासून गणपती तयार करणे ही स्पर्धा सुद्धा दरवर्षी गो ग्रीन फाऊंडेशन शेगाव शहरामध्ये राबवीत असते.ह्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन गो ग्रीन फाऊंडेशन करीत असते याचाच एक भाग म्हणून सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रूग्णालयाच्या विनंती वरून गो ग्रीन फाउंडेशन ने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत शेगाव शहरातील विविध रक्तदात्यांनी , नागरिकांनी आज रोजी रक्तदान करून आपले सामाजिक ऋण फेडले.आजच्या रक्तदान शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते लोकमतचे शहर प्रतिनिधी अनिल उंबरकर कारण आज त्यांचा वाढदिवस त्यांनी रक्तदान करून गो ग्रीन सोबत साजरा केला.आजच्या रक्तदान शिबिराकरिता सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वृंद यांचे अमुल्यं सहकार्य लाभले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गो ग्रीन च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले व अनेक सदस्यांची आज उपस्थिती होती तसेच गो ग्रीन फाउंडेशनच्या बऱ्याच सदस्यांनी स्वतः रक्तदान करून”रक्तदान हे श्रेष्ठदान आहे” हे सार्थ करून दाखवले.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button