Uncategorized

लोहारा सावखेडा गाव परिसरामध्ये दारू – पत्ता – सट्याचा धुमाकुळप्रशासन मात्र मौनात नागरीकांत संताप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे

रावेर तालुक्यातील असलेले मौजे लोहारा व सावखेडा गाव परिरातील ठिकठिकाणी अवैध दारू – पत्या सट्यांचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असुन हे धंदे अक्षरशा जोमात चालत आहे त दिवसा ढवळ्या अवैध धंध्यांची उघड – उघड विक्री होत असतांना दिसत आहे तरी पोलिस प्रशासन व दारू बंदी विभागाचे अधिकारी मात्र याकडे डोळे झाक करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे

यामुळे गाव परिसरातील तरुणाई तसेच अल्पवयीन मुलेहि या अवैध धंद्यांच्या आहारी जावु लागली आहेत सामाजिक स्तरावर याचे गंभीर परिणाम दिसुन येत असुन गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे
व तसेच गावामध्ये अवैध रित्या चालणारे धंदे होत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे
आणी संपूर्ण गाव परिरामध्ये ठिकठीकाणी अशा प्रकारे दारू विक्री होत असणे हे केवळ कायद्याला झुगारुण देणेच नव्हे तर समाजाच्या ढासळत्या स्थितीचे स्पस्ट चित्र आहे

नागरीकांचा प्रशासनाला सवाल?

लोकांच्या आरोग्याशी व भावी पीढीच्या भवितव्यांशी खेळणारे हे धंदे थांबविण्यासाठी पोलिस व दारूबंदी प्रशासन काय कारवाई करणार?
या धंद्यांना आळा घालून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाणार की नाही ?
याकरीता नागरीकांचे लक्ष प्रशासना कडे लागलेले आहे

सामाजिक हानी गंभीर

दारू व जुगारामुळे केवळ कुटुंबाची आर्थिक हानीच नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये बोलले जात आहे आज या धंद्यांमुळे अनेक घरांची उद्धवस्त स्थिती निर्माण झाली आहे
तसेच मुले व नवतरुण युवापिढी हि दिवसनदीवस न्यसनाधिन होत आहेत तरीही प्रशासन निष्क्रीय आहे हिच खरी खंत आहे असे ग्रामस्थांनी संतापाने व्यक्त केले आहे

कारवाई ची मागणी

गावामध्ये अशा प्रकारे चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा बसणे गरजेचे आहे अन्यथा नागरीक कठोर आंदोलन ऊभारतील असा ईशारा हि ग्रामस्थांनी दिला आहे तसेच प्रशासनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली जाते परंतु गावामध्ये अवैध धंदे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे यावरुण असे पस्ट समजले जाते की कायदा व सुव्यवस्थेचे कुठेतरी उलंघन होत आहे तरी सुद्धा प्रशासन याकडे जाणून – बुजून डोळे झाक करीत आहे तरी लवकरात लवकर अवैधरित्या चालणारे हे धंदे बंद न झाल्यास जनतेचा पोलिस प्रशासन यांच्यावर असलेला भरवसा व विश्वास हा कायम स्वरूपी हवेला स्पर्श होत असल्याचा चर्चेला उधान आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button