बुलढाणामलकापूर

घरकुल प्रकरणात शासनाची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी (शेख निसार) बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील लोकांनी पंतप्रधान आवास योजना नुसार घरकुल मंजूर झाल्यावरही घर न बांधता कागदपत्री रेकॉर्ड दाखवले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर व घरकुल चा लाभ घेणाऱ्यांवर चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिरसाळा येथील पुंडलिक कृष्णा पाटील यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरसाळा येथील ग्रामसेवक संतोष करवते यांनी एकाच घरातील दोन लोकांना घरकुलाचा लाभ दिला. एवढेच नव्हे तर ज्यांचे पक्के घर आहे त्यांना सुद्धा घरकुलाचा लाभ दिलेला आहे. काही बहाद्दरांनी फक्त कागदपत्रे वर घर दाखवून घरकुलाचे चेक काढलेले आहेत. 2023/24 /2025 मध्ये असे बोगस बनावट घरकुल बांधण्यात आलेले आहे. परिणामी योग्य लाभार्थ्यांना लाभ न मिळता दुसऱ्यांनाच लाभ मिळतो त्यामुळे अशा घरकुलांची चौकशी होऊन संबंधित अधिकारी कर्मचारी व घरकुलाचा लाभ घेणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सिरसाळा येथील पुंडलिक पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button