बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी अन्न व औषध प्रशासनच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने जप्त, कारवाई होणार?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

शेगावातील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकत तपासणी मोहीम राबवली आहे. या कारवाईदरम्यान कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेगावातील या प्रसिद्ध खाद्यपदार्थ केंद्राची तपासणी करण्यात आली.शेगाव हे धार्मिक स्थळ असल्याने दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात आणि येथील प्रसिद्ध कचोरीचा आस्वाद घेतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचोरी तयार करण्याची प्रक्रिया, वापरण्यात येणारा कच्चा माल, स्वच्छतेचे निकष आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन केले जाते की नाही याची सखोल तपासणी करण्यात येत आहे.अधिकाऱ्यांनी कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तेल, मसाले, पीठ आणि इतर साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या नमुन्यांमध्ये भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अन्न व औषध प्रशासनच्या राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button